कोंढव्यातील हिर्कनींची इंटरनेट ह्या विषयावरील कार्यशाळा

Written by  Mohini Chavan

४/८/२०१४ ह्या दिवसाचा अनुभव न विसरण्यासारखा...खुप पाऊस सुरु होता आणि आम्ही workshop घ्यायला निघालो. तीथे पोहचल्या वर पाहिलं तर कुणीच नव्हत...अर्चना ताई एक गृहिणी आणि त्यात त्यांनी इंटरनेट कार्यशाळेच्या व्यवस्थापनाचे काम पूर्णतः एकट्यांनी केले. इंटरनेट कार्यशाळेसाठी सगळ्या बायकांना बोलावणे त्यांना ते लक्षात राहावे म्हणून तीन ते चार वेळा त्याची आठवण करून देणे. परंतु पावसामुळे अर्चना ताई देखील shock झाल्या होत्या. त्या म्हणाल्या कि पावसाने सगळाच घोळ केला.

आम्हाला थोड tension आलं कि आता बायका येतील का? परंतु थोड्या वेळाने सगळ्या हिरकणी हळु हळु जमु लागल्या. १४ बायकांनी workshop साठी हजेरी लावली...त्यात मध्यम वयीन बायका तसेच तरुण मुली देखील आल्या होत्या. त्यात काही बायका घरीच राहणाऱ्या होत्या, एक दोन सर्विस करणाऱ्या व स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या होत्या, तर काही मुली शिकणाऱ्या तर काही काही घरीच राहणाऱ्या होत्या

स्वाती शिंदे ह्या हि कार्यशाळा घेणार होत्या त्यांच्या मनातील आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता ...त्यांनी सांगितले कि “अश्या वेगवेगळ्या गटातील बायकां सोबत आपल्याला इंटरनेट कार्यशाळा घ्यायची आहे आणि त्यांच्यात इंटरनेट विषयीची जागरुकता निर्माण करायची आहे याचाच आनंद होत आहे.” त्यात काही बायका म्हणाल्या देखील आम्ही इंटरनेट वापरलेलं नाही...मुलं वापरतात...त्यातलं कळत नाही...परंतु जेव्हा ह्या कार्यशाळेला सुरुवात झाली, त्यानां हळू हळू त्यात रस निर्माण होतो आहे हे जाणवायला लागले आणि त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. कार्यशाळेत होणाऱ्या प्रश्न उत्तरांना ऐकून खूप बर वाटल कि आपल्या संस्थे मुळे सतत घरात असणाऱ्या आणि बाहेरच्या गोष्टीना वाव न मिळणाऱ्या बायकांना बाहेरच्या जगाची ओळख होत आहे. त्यातल्या काही बायकांनी विचारले कि पुढच शिकवणार का?...त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सांगत होता कि त्या देखील इंटरनेट शिकून वापरू शकतात आणि माहितीपूर्ण राहू शकतात.

त्या आपल्या इंटरनेट कार्यशाळे बद्दल इतरांना सांगतील असे त्यांनी सांगितलं...त्यांना इंटरनेट कस असत हि ओळख करून देण्यासाठी जेव्हा tablets दिले तेव्हा सुरुवातीस मुलीं शिवाय कुणी हात लावायला तयार नव्हते. नंतर जेव्हा त्यांना सांगितल कि एखादा पदार्थ बनवण्याची कृती शोधा, तसेच UCD अंतर्गत कुठले कुठले courses आहेत आणि त्यांना त्याच्या जवळील ई-सुविधा केंद्र शोधण्यास सांगितले तेव्हा त्यांनी त्यात रस दाखवला. त्यांना खूप आनंद झाला कि त्या पण हे घरी बसून करू शकतील. त्यात आमच्या इंटरनेट कार्यशाळा घेणाऱ्या madam ने बायकांच्या लक्षात याव म्हणून खुप कळकळीने त्यांना समजावून सांगितलं. हे ३ तास कसे गेले हे कळलच नाही.

Leave a comment